देवपुर येथील स्वामी नारायण मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहराच्या सौंदर्यात भर घालणारे नुतन देवपूर (दत्त मंदिर परिसर) येथे असलेले श्री भगवान स्वामी नारायण मंदिर बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

हिंदी भाषेत लिहिलेले पत्र मंदिराच्या टपालपेटीतून आल्याने खळबळ उडाली आहे.

दोन हिंदी भाषेतील निनावी पत्र शनिवारी सायंकाळी टपाल पेटीत मिळाली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांना याची माहिती दिली. व पत्रे देखील दिली. त्यानंतर पोलिसांनी मंदिर परिसराला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे उपविभागिय पोलीस अधिकारी यांनी सांगितले. या पत्राची सखोल चौकशी पोलिस प्रशासन करत असून सत्यता लवकर उघड होईल.

Loading...
You might also like