पेन्शनची रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेवानिवृत्त झालेल्या दोन वृद्धाला त्याच्या घरातील लॅन्डलाईनवर फोन करून फॅमिली पेन्शनची रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवून ३ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रुपा तोमर, स्नेहा सिंग, दिया शर्मा, राज मल्होत्रा या चौघांवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सत्तर वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या घरातील लॅन्डलाईनवर १५ जूलै २०१७ रोजी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण पेन्शन फंड रेग्युलेटरी एन्ड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडीया नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना त्यांच्या फॅमिली पेन्शनमधून रक्कम देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी त्यांना १ लाख ८७ हजार रुपये खात्यात भरण्यास सांगितले.

तसेच त्यांच्यासोबतच आणखी एका वृद्धाला १ लाख ६७ हजार रुपये भरण्यास लावले. त्यानंतर त्यांना कोणतेही पैसे मिळाले नाहीत.त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत