धुळे : घरफोडी करणाऱ्या ३ जणांना गुन्हे शाखेने केले गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – भावसार कॉलनीत गजराज अपार्टमेंट मध्ये राहणारे डॉ. अजित गजानन पाठक यांचे घरात चोरट्यांनी २९/६/२०१९ रोजी घरफोडी करुन चोरट्यांनी सोने, दागिने, रोख रक्कम असा ७ लाखों रुपयांचा ऐवज लुटून नेल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. परिसरात मोजक्या दोन ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे होते. त्यातील माहितीच्या आधारे पोलीसांनी तपास चक्रे फिरवत गोपनिय माहिती गोळा करत घरफोडी करणारा इम्रान शेख उर्फ इम्रान बाचक्या रा.अजमेरा नगर ह.मु.मालेगाव त्याचेसह दोन साथीदारांचे सहाय्याने केले. माहिती घेऊन त्याचा शोध घेतला असता इम्रान बचक्या नेहमीच परगावी राहत असे. त्याचे सतत माहिती घेत तो सुरतहून धुळ्यात येणार माहिती मिळाली. त्या आधारे एक पथक तयार करुन अक्कलपाडा जवळ पाठलाग करुन ताब्यात घेतले.

त्याचे सोबत अन्य दोन साथीदार खलील मोहम्मद हानिफ जुलाह सार्वजनिक हॉस्पिटल जवळ गरीब नगर, चाळीसगाव रोड, शाहरुख रशिद पठाण उर्फ बव्बु वय २२  रा.स्लाटर हाऊस मारूती मंदिर जवळ धुळे यांना अटक करुन घटना स्थळाहून चोरलेले स्पोर्टस शुज संशयित इम्रानचे पायात मिळून आले. आरोपी कडुन २३० ग्रँम सोन्याचे दागिने, १४६ ग्रँमची चांदीची प्लेट एक मोटर सायकल असा एकुण ९,०३,८०५ किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजू भूजबळ, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.हेंमत पाटील मार्गदर्शनाखाली पसोई हनुमान उगले, पोसई अनिल पाटील, पो.कॉ.नथ्थु भामरे, रफिक पठाण, संदिप थोरात, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, राहुल सानप, रविकिरण राठोड, नितीन मोहने, श्रीशेल जाधव, तुषार पारधी, मयुर पाटील पो.ना गौतम सपकाळ, अशोक पाटील हि कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like