आईच्या अनैतिक संबंधाने घेतला तीन मुलींचा बळी

बिहार : पोलिसनामा ऑनलाइन

बिहारमधील बांका जिल्ह्यात घरात घुसून तीन सख्यां बहिणींवर नराधामांनी बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आईच्या अनैतिक संबधामधून ही घटना घडल्याचे परिसरातील नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार समजतेय. दरम्यान घटनेच्यावेळी मृत मुलींचे वडील व आई दोघेही घराबाहेर होते.

याघटने बाबत सविस्तर वृत्त असे की, मुलींच्या आईचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यामुळे आईचे असलेल्या यासंबंधातूनच या मुलींची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा शेजारी राहणा-या नागरिकांमध्ये आहे. बांका जिल्ह्यातील कादरा गावातील ही घटना घडली असून, घटनेच्या वेळी मुली घरी एकट्याच होत्या.

मध्यरात्री काही तरुणांनी घरात जाऊन त्या मुलींवर सामुहिक बलात्कार करुन नंतर गळ्यावर वार करुन हत्या केली.आरोपींच्या वडिलांचे अनैतिक संबंध मृत मुलींच्या आई बरोबर असून ते मुलाला मान्य नव्हते. या कारणामुळे मुलाने काही मित्रांच्या मदतीने या मुलींची हत्या केली. मुलींचा खुन केल्यानंतर आरोपींनी हत्यारे तिथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला. या मुलींची हत्या करण्यात आली तेव्हा घरात कोणीच हजर नव्हते.

घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर या तीनही मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले. पोलीस आरोपींच्या मागावर असून तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. लवकरच आरोपींना अटक करु, असे आश्वासन एसपी चंदन कुशवाह यांनी दिले आहे.