चमत्कार ! 3 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळया ! तरीसुद्धा वाचले ‘प्राण’

काबुल : जाको राखे साईयां मार सके न कोय, ही म्हण एका नवजात मुलीच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली आहे. ही चमत्कारिक घटना अफगाणीस्तानची आहे, जेथे दहशतवाद्यांनी 3 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीला दोनवेळा गोळी मारली, परंतु ही मुलगी बचावली. काबुलच्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एकुण 24 लोक मारले गेले. यामध्ये नवजात बाळांच्या माता, नर्सेस आणि 2 नवजात बाळांचा समावेश आहे. मात्र, या हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही एक नवजात बाळ बचावले आहे. परंतु, या बाळाची आई हल्ल्यात मारली गेली.

ईसिसशी संबंधीत दोन दहशतवाद्यांनी या हॉस्पिटलवर हल्ला केला होता. आत घुसताच दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकण्यास आणि गोळ्या चालवण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांनी पोलिसांचे कपडे परिधान केले होते. या हल्ल्यात 3 तासापूर्वी जन्मलेल्या एका मुलीच्या पायाला दोन गोळ्या लागल्या. हल्ल्यात एकुण 24 जण ठार तर 15 जण जखमी झाले. नंतर या दशहतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जखमी नवजात बाळावर डॉक्टरांनी नंतर शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले.

जखमी बाळाला काबुलच्या इंदिरा गांधी चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात मरण पावलेल्या बाळाच्या आईच्या मृत्यूने तिचे वडील हादरून गेले आहेत. त्यांनी आपल्या नवजात मुलीला पत्नीचे नाव दिले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, नाझियाच्या पायातून गोळी काढण्यात आली असून ती मोठी झाल्यावर चालू-फिरू शकते.