वडिलांनी 3 मुलांना कारमध्ये बांधून ‘जाळलं’, पत्नीनं हॉस्पीटलमध्ये जीवच ‘सोडला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका माजी आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडूने बुधवारी आपल्या पत्नीसह तीन मुलांना कारमध्ये बंद करुन पेटवून दिले. या धक्कादायक घटनेत 6, 4 आणि 3 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. तर जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तिचाही मृत्यू झाला. हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेनचे आहे.

एका वृत्तानुसार 31 वर्षीय हन्ना बॅक्सटर नावाच्या महिलेने पेटत्या कार मधून उडी मारली, तिने सांगितले की पतीने तिला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने या महिलेला आग विझवण्यास मदत केली होती.

या घटनेत मुलांचे वडील रोवन चार्ल्स बॅक्स्टर देखील जखमी झाले होते. त्याने या घटनेनंतर स्वत:ला चाकू भोकसून आत्महत्या केली. घटनेपूर्वी सर्वजण एसयूव्हीमध्ये बसले होते. रोवन ऑस्ट्रेलियाचे नॅशनल रग्बी लीगचे माजी खेळाडू होते.

काही वृत्तानुसार, काही वर्षांपूर्वी पती पत्नीच्या नात्यात फूट पडली होती आणि महिला आपल्या पालकांसोबत राहत होती. रोवन चार्ल्स यांच्या एका मित्राने सांगितले की तो नैराशात होता.

या दाम्पत्यांच्या शेजारच्यांनी सांगितले की दोघे एका भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यानंतर ते वेगळे झाले. यापूर्वी ते एका सुखी कुटूंबाप्रमाणे राहत होते आणि शेजारच्यांनी कधी त्यांच्यात वाद झाल्याचे पाहिले नाही.