एका दिवसात स्वाइन फ्लूने घेतले ३ बळी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकमध्ये २८ जणांना स्वाईन फ्लूची लागण असून त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता ११४ वर गेली आहे. १५ दिवसांमध्ये स्वाईन फ्लूने २६ जणांचा बळी गेला आहे. पुणे पाठोपाठ नाशिकमध्येही स्वाईन फ्लू बळावत असल्याचे दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eadf8dee-d1c2-11e8-9794-43a738ee8f46′]

नवरात्रीमुळे दांडिया खेळण्यासाठी मोठी गर्दी होत असून  ठिकठिकाणी यात्रा उत्सवही सुरू आहेत. त्यामुळे गर्दीतूनच स्वाईन फ्लूचा फैलाव होत असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्वाईन फ्लू आणि डेंग्यूपासून सावध राहण्यासाठी गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात स्वाईन फ्लूबरोबर डेंग्यूनेसुद्धा धुमाकूळ घातला आहे. सध्या डेंग्यूचे ३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. जानेवारीपासून आतापर्यंत २ हजार १५१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ६०६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
[amazon_link asins=’B003QKBVYK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’09a44b12-d1c3-11e8-834d-e73f63e8f98e’]

मुंबईत डेंग्यूचे संकट कायम

मुंबई : डेंग्यूची साथ शहरामध्ये सातत्याने वाढत असून, मागील पंधरा दिवसांमध्ये डेंग्यूच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूसदृश तापामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत २१७३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गेल्यावर्षी पूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये हे प्रमाण २१२ इतके होते. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत डेग्यूमुळे १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. १५ ते २९ या वयोगटामध्ये डेंग्यूचा ताप येण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, यातील पुरुष रुग्णांची संख्या ८४, तर स्त्रियांची संख्या २४ इतकी आहे. या वयोगटातील एकूण १०८ जणांना डेंग्यूच्या तापाने जेरीस आणले आहे. डेंग्यूच्या तापाचा फैलाव होण्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी पालिकेने १ ऑक्टोबरपासून चोवीस प्रभागामध्ये विशेष मोहीम सुरू केली आहे.

राज्यात गाजलेले बुलडाण्यातील भुकबळी प्रकरण मुख्यमंत्र्यांना माहितच नाही


जाहिरात