विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन 

सुधाकर बोराटे
लग्नात ठरलेल्या हुंड्यातील चार लाख रुपये दुकानासाठी माहेराहून आणावेत व स्वयंपाक नीट येत नाही या कारणास्तव एकवीस वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींनी वारंवार जाचहाट करून दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सोनाली गणेश चोरमले (वय २१ राहणार बळपुडी ता.इंदापूर जि.पुणे) असे विवाहितेचे नाव आहे.

गणेश बबन चोरमले (नवरा),अरूणा बबन चोरमले (सासू), बबन माणिक चोरमले (सासरा सर्व राहणार बळपुडी ता इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.यासंदर्भात मयत सोनालीचे वडील धोंडिबा गंगाराम हाके (राहणार कावळवाडी ता.करमाळा जि.सोलापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’584c40c8-bef4-11e8-ac30-475ba6e585e0′]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली हिचा विवाह मे २०१६ मध्ये कावळवाडी येथे घरासमोर झाला .त्यावेळी लग्नात ५ लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. लग्न कार्यात जास्त  खर्च झाल्यामुळे मयत सोनालीच्या वडीलांनी हुंड्या पोटी एक लाख रुपये दिले होते.उर्वरित चार लाख रुपये नंतर देण्याचं कबूल केले होतेे. मयत सोनालीला अठरा महीने वयाची सानिका नावाची मुलगी आहे. २७ आॅगष्ट २०१८ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी  सोनाली माहेरी नवऱ्यासोबत आली होती. मला नवऱ्यासोबत सासरी पाठवू नका मला खूप त्रास आहे असे तिने सांगितले होते. सासरची मंडळी खूप त्रास देत आहेत. हुंड्याचे चार लाख रुपये मागून घे असे म्हणून सारखे मारहाण करतात. शेतात एकटी असताना सासऱ्याने हात धरला होता. कोणाला सांगितले तर मारून टाकेल अशी वारंवार धमकी दिली होती. त्यामूळे सोनालीला खुप भिती वाटत होती. हुंड्याची रक्कम मागून घे म्हणून सारखी मारहाण करत होते. याकारणास्तव २० सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बळपुडी येथील पाण्यानें भरलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या आशयाची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. फिर्यादीवरून नवरा, सासरा, सासू यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.