खळबळजनक ! घरात घुसून बिबट्याने केला तिघांवर हल्ला

देवरुख : पोलीसनामा ऑनलाईन – बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. जंगलं, गावं त्याहीपलीकडे बिबट्याने आता शहरी भागात देखील दहशत माजवाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता संगमेश्वर तालुक्यातील आंबवली तळीच्या वाडीत चक्क घरात घुसून बिबट्याने तिघांना जखमी केल्याची माहिती उजेडात आली आहे. ही घटना आज शनिवारी पहाटे घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहन हरिशचंद्र खामकर यांच्या घरातील पाठीमागच्या बाजूला कोंबड्यांचा खुराडा आहे तसेच तेथे कुत्र्याची २ लहान पिल्ले होती. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पडवीच्या दरवाजातून आत येत आधी कुत्र्याच्या पिलांवर बिबट्याने हल्ला केला. काहीतरी आवाज आल्यामुळे मोहन यांनी मागील दरवाजा उघडला असता. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मोहन यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी मनीषा यांनी पडवीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी बिथरलेल्या बिबट्याने मनीषा यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर तो किचनमध्ये शिरला.

मनीषा आणि मोहन यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील श्रद्धा खामकर यांनी धाव घेतली. यावेळी मोहन आणि मनिषा यांना जखमी अवस्‍थेत पाहून त्‍यांना पाणी प्यायला देण्यासाठी त्‍या किचनमधे गेल्या असता, बिबट्‍याने त्यांच्यावरही हल्ला करून त्‍यांना जखमी केले.

तरीही बिबट्या मोकाटच

ही घटना वनविभागाला कळविताच वनपाल उपरे आपल्या सहकाऱ्यांसह पिंजरा घेवून घटनास्थळी पहाटे ५.३० च्या सुमारास पोहोचले. तोपर्यंत या घटनेची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली होती. यावेळी गावातल्‍या लोकांनी खामकर यांच्या घरासमोर गर्दी केली. यावेळी काही गावकऱ्यांनी जखमींना देवरूखात आणले. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्या सर्वांना रत्नागिरी सिव्हील येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वनविभागाने घराची पाहणी केली असता, बिबट्या वनविभागाला सापडला नाही. त्‍यामुळे वनविभागाकडून बिबट्‍याचा शोध सुरू आहे.

ह्याहि बातम्या वाचा

‘गावात आम्हाला पाणी नाही’ असं म्हणणाऱ्या गावकऱ्याला बबनराव लोणीकरांची दमदाटी

सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा हृदय विकाराने मृत्यू

मनोमिलनाच्या बैठकीनंतर उदयनराजेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

युद्धासाठी आपण किती सज्ज !