ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

अोव्हरटेक करताना झालेल्या भिषण अपघातामध्ये तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दुचाकीवरुन इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमाला असलेले तीन विद्यार्थी खानापूरकडे निघाले होते. प्रभुनगर जवळ एका वाहनाला अोव्हरटेक करत असताना समोरील वाहनाला जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरात होती की त्यामुळे तीनही तरुण पंचवीस फुट दूर फेकले गेले. त्यामुळे त्यांचा जगीच मृत्यू झाला. घटनास्थळी अक्षरशाह रक्ताचा सडा पडला होता.

अपघातामुळे काही काळ या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सदर घटनेची माहिती बेळगाव ग्रामिण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरूवात केली.