टायगर श्रॉफची बहिण ‘कृष्णा’नं शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे ‘खुल्लमखुल्ला’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅक्टीव आणि चर्चेत असते. पुन्हा एकदा तिचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B8qDrysgltw/

कृष्णा श्रॉफ आपला बॉयफ्रेंड इबान हॅम्स सोबत वॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. कृष्णानं आपल्या बॉयफ्रेंडसोबत हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/B8hsmxzgbic/

समोर आलेल्या फोटोत दिसत आहे की, कृष्णा ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये इबानसोबत टाईम स्पेंड करत आहे. दोघंही समुद्राच्या लाटांमध्ये आनंद घेत पोज देताना दिसले.

कृष्णाचा बॉयफ्रेंड इबानबद्दल बोलायचं झालं तर तो एक प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेअर आहे. इबान ऑस्ट्रेलियन नॅशनल बास्केटबॉल लीगही खेळला आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियन बास्केट बॉल असोसिएशनचा भागही आहे.

https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/

इबानच्या आणि तिच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना कृष्णा म्हणाली होती की, “आमची भेट सोबो हाऊसमध्ये झाली होती. मी त्याच्या एका मित्राला ओळखत होते. आम्ही एकमेकांना भेटायला गेलो. यानंतर त्या मित्राने इबानलाही तिथे बोलावलं. नंतर मी त्याच्यासोबत बातचित केली. आम्हाला बास्केटबॉल आवडत असल्यानं आमची त्यावरच चर्चा झाली.”

https://www.instagram.com/p/B5CrCS1AFJO/

https://www.instagram.com/p/B23kzEUAdU2/