पाकिस्तानला मैदानात लोळवल्यानंतर ‘टीम इंडिया’ला करिना-सैफ अली खानच्या मुलाची ‘तैमुर’ची ‘सलामी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध कलाकार यांच्या मुलाची चर्चा तर संपतच नाहीये. त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंत रोज काहीनकाही तरी किस्से व्हारयल होत असतात. या स्टार किड्सचे नाव आहे ‘तैमुर’. याच्या चर्चांना खूप उधाण आले आहेत.

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर यांच्या मुलाचे किस्से ऐकावे तेवढे कमीच. आपल्या आई-वडिलांचा लाडका तैमुर सध्या इंटरनेटवर खूपच प्रसिद्ध आहे. काल झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅच नंतर तैमुरचा वेगळ्या अंदाजतला फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत तैमुर भारतीय क्रिकेट टिमला सैल्यूट करताना दिसत आहे. तैमुर सध्या आपल्या फॅमिलीसोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. काल झालेल्या विश्व कप मॅचमध्ये इंडियाने सातव्यांदा पाकिस्तानला हरविले आहे. पाकिस्तानला हरवून इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. बॉलिवूडच्या सगळ्या स्टारने हा विजय साजरा केला आहे. यामध्ये क्यूट स्टार किड्स तैमुरही मागे हटला नाही. त्यानेही इंडियाला शानदार सलामी दिली आहे.

या फोटोमध्ये तैमुरने ब्लू जर्सी घातली आहे. फोटोत तैमुर खूप क्यूट दिसत आहे. नेहमी प्रमाणे या फोटोने देखील इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे. हा फोटो लोकांना खूप आवडला आहे. या फोटोला लाखो लोकांनी लाइक आणि कमेंट केल्या आहेत.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा