नंतर वेदना सहन करण्याऐवजी आधीच ‘या’ 6 उपायांनी दात, हिरडया ठेवा ‘निरोगी’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लहान मुलांसह मोठ्यांमध्ये दातात किड लागणे किंवा हिरड्यांचे सूज येण्याची समस्या निर्माण होते. तर सतत गोड पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांना कॅविटीजची समस्या उद्भवते. दुखत असलेल्या किंवा कीड लागलेल्या दातांकडे लक्ष नाही दिलं तर हजारो रुपये खर्च करुन दातांची ट्रीटमेंट करावी लागते. मात्र, जर तुम्ही यापूर्वीच आपल्या दातांची काळजी घेतली तर होणार त्रास कमी करता येऊ शकतो.

दातांवरती एक सुरक्षाकवच असत. त्याला इनॅमल असे म्हटलं जात. हे कवच कॅल्शिअम आणि फॉस्फोरसपासून तयार झालेलं असत. जेव्हा एखादा व्यक्ती जास्त गोड पदार्थांचे सेवन करत असते. तेव्हा पीएच व्हॅल्यू कमी होतात आणि दातांमध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. गोड व स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतो. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते.

कॅव्हिटिज पासून वाचण्यासाठी दातांची अशी घ्या काळजी

१. गोड पदार्थांचे सेवन कमी करा. गोड खाल्ल्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया वाढत जातात. जे तोंडाला एसिडिक बनवतात. यामुळे दात डॅमेज होण्याची शक्यता असते. जर तुम्ही गोड पदार्थ खात असाल तर लगेच गरम पाण्याच्या गुळण्या करा.

२. श्वासांना दुर्गंधी येत असेल तर अनेकांना ती पोट साफ होत नसल्याचे तक्रार आहे असे वाटते. मात्र ९५ टक्के लोकांमध्ये हिरड्या आणि दातांची योग्य सफाई न केल्यामुळे आणि त्यात किड झाल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. त्याकरता काही सुद्धा खाल्यानंतर आधी दात स्वच्छ करा.

३. एल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटबंद फूड, सोडा, चहा आणि कॉफी यामुळे दात खराब होतात. त्यासाठी अशा एसिडिक पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ करा.

४. दुर्गंधी घालवण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी किंवा पुदिन्याची पाने चावून खा. मिंट किंवा इतर सुवासिक पण शुगरफ्री च्युईंग गम खाल्याने देखील दुर्गंधी कमी होते.

५. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. सॉफ्ट ब्रशचा दात घासण्यासाठी वापर करावा.

६. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचे दात चांगले ठेवायचे असतील आठवड्यातून एकदा गरम पाण्यात पेरूची पान उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करुन पाण्याच्या गुळण्या करा. त्यामुळे तुमचे दात दीर्घकाळापर्यत मजबूत राहतील.