मेन ग्रूमिंग टिप्स : लॉकडाऊनमध्ये घरी शेविंग करण्याच्या Tips

पोलीसनामा ऑनलाईन : कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना विविध समस्या भेडसावत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे सेल्फ ग्रूमिंग. ना महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊ शकत, ना पुरुष सलूनमध्ये. अशा परिस्थितीत, सलूनमध्ये जाऊन दाढी करणाऱ्या पुरुषांना जास्त अडचणी येत आहेत. घरी दाढी करण्याची सवय नसल्याने ते दाढी योग्यपद्धतीने ट्रिम करू शकत नाही. अश्यावेळी काही सोप्या टिप्स आहेत, ज्याद्वारे आपण दाढी ट्रिम करण्यासोबतच आपल्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यास सक्षम असाल.

एक्सफोलिएट
शेव्हिंगची पहिली पायरी म्हणजे त्वचेला योग्यप्रकारे एक्सफोलिएट करणे. एक्सफोलिएट करण्यासाठी आपल्याकडे स्क्रबर असणे आवश्यक आहे. यासह आपली आपली त्वचा आधी स्क्रब करा. एक्झोलीएटर देखील वापरला जाऊ शकतो. स्क्रबिंग नंतर आपला चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

गरम पाण्याचा वापर
दुसर्‍या चरणात थोडेसे पाणी गरम करावे. त्यात टॉवेल भिजवून नंतर पाणी पिळा. मग एक मिनिट हा ओला टॉवेल आपल्या चेहऱ्यावर लावा आणि काढा.

तेलाने करा मालिश
तिसऱ्या चरणात आपल्याला आपल्या दाढीला तेल लावावे लागेल. आपण नारळ किंवा मोहरीचे तेल देखील लावू शकता. तेल लावल्याने केस मऊ होतात, ज्यामुळे केस कापणे आणि शेव करणे सोपे होईल.

फेस वॉश लावा
चौथा टप्पा म्हणजे चेहरा धुणे. फेस वॉश लावल्यास तेल निघते. हे लावून 1 ते 2 मिनिटांसाठी आपला चेहऱ्यावर चोळा आणि नंतर धुवा.

आता दाढी करा
पाचवा टप्पा म्हणजे शेविंग करणे. प्रथम शेव्हिंग क्रीम लावा. चांगला फेस करा. आता रेझरने हळूवारपणे केस काढा. रेझर एका दिशेने चालवा. गरम पाण्याने वेळोवेळी रेजर स्वच्छ करा. जर सर्व केस व्यवस्थित बाहेर आले नाहीत तर पुन्हा शेविंग करा आणि ही प्रक्रिया पुन्हा करा.

टॉवेलने स्वच्छ करा चेहरा
आता सहाव्या चरणात स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसून टाका. रुमाल किंवा लहान टॉवेल थंड पाण्यात भिजवा आणि चेहऱ्यावरून हलके फिरवा. हे चेहर्‍यावरील फेस किंवा केस काढून टाकेल.

मॉइश्चरायझर लावा.
शेवटी, चेहऱ्यावर चांगल्या क्वालिटीचे मॉइश्चरायझर लावा. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आफ्टरशेव्ह लावल्यानंतर तुम्हाला एक आकर्षक आणि चमकणारी त्वचा मिळेल.