नशीबवान ! तिवरे धरणफुटीमध्ये वाहून गेलेला तब्ब्ल १८ तासानंतरही ‘जिवंत’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडून ते काल फुटल्यानंतर धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेली होती. त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये २४ जण पाण्याबरोबर वाहून गेले होते. या वाहून गेलेल्यांपैकी बाळकृष्ण चव्हाण हे ५५ वर्षांचे गृहस्थ तब्बल १८ तासांनंतर देखील जिवंत आढळले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या नैसर्गिक आपत्तीमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला होता तर २४ जण वाहून गेल्याचे वृत्त आले होते. वाहून गेलेल्यांपैकी १२ नागरिकांचे मृतदेह आतापर्यंत सापडले असून ११ जण अजूनही बेपत्ता आहेत.चिपळूणचे रहिवासी असणारे बाळकृष्ण चव्हाण हे मात्र आश्चर्यकारकरित्या आणि नशिबाने वाचले आहेत. तिवरे गावातील भेंडेवाडीला या धरणफुटीनंतर मोठा तडाखा बसला असून येथील संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब वाहून गेले आहेत. येथे चव्हाणांची वस्ती सर्वाधिक आहे त्यातीलच बाळकृष्ण चव्हाण एक.

या भागात बचावकार्य वेगाने सुरु असून स्थानिक गावकऱ्यांच्या सहाय्याने एडीआरएफ आपत्तीग्रस्तांना मदत करत आहे. चव्हाण जिवंत आढळून आल्यानंतर अजूनही बेपत्ता असणाऱ्यांपैकी काही जण जिवंत असण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान प्रशासन मदतकार्यासाठी वेगाने सरसावले असून याठिकाणच्या लोकांचे जीवन स्थिरस्थावर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

वंचितने कॉंग्रेसला दिला ‘एवढ्या’ जागांचा फॉर्म्यूला, मंजूर असल्यास कॉंगेसने १० दिवसांच्या आत संपर्क साधावा – वंचित बहुजन आघाडीचा अल्टीमेटम

पुण्यातील रुग्णालये आणि कॉलेजमध्ये बेकायदा पार्किंग बंद करा – रिपाइं