काँग्रेससह ‘या’ पक्षाचे एकुण १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजपच्या बडया नेत्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेसला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. कारण या सर्व पक्षातील तब्बल १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप नेते मुकूल रॉय यांनी केला आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूकीपासून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय वाद रंगला आहे. त्यात भाजपला पश्चिम बंगालमध्ये जास्त जागा जिंकण्यात यश आले. तर लोकसभेत एकहाती सत्ता मिळण्यात भाजप यशस्वी झाला. भाजपला एकट्याला ३०३ जागांवर विजय मिळाला. परंतू यानंतर भाजप आणि टीएमसी मध्ये जोरदार वादंग उठला आहे. दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यानंतर अनेक टीएमसीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचे चांगलेच राजकीय नाट्य रंगले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या आमदारांची यादी तयार
परंतू आता भाजप नेते मुकूल राय यांनी एक अजब दावा करत पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप आणला आहे. मुकूल रॉय यांनी सांगितले आहे की पश्चिम बंगाल मधील टीएमसी, काँग्रेस आणि सीपीएमचे १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणाच्या तयारीत आहेत.

असा दावा करुन ते थांबले नाहीत तर त्यांनी असे ही स्पष्ट केले की भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या या आमदारांची यादी आम्ही तयार केली आहे आणि हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. भाजप नेते मुकूल रॉय यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच