मावळची उमेदवारी भाजपाकडे देण्यासाठी मुख्यमंत्रींकडे साकडे

पिंपरी चिचंवड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेनाची आगमी लोकसभा-विधानसभा निवडणूकसाठी युती झाली आहे. मात्र मावळची जागा भाजपच्या वाट्याला घेऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आले होते त्यावेळी सर्व नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जगताप समर्थकांनी मावळसाठी दावा केला होता.

मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना युतीची उमेदवारी दिली तर त्यांचा नक्कीच पराभव होईल. या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. लक्ष्मण जगताप हेच युतीचे सक्षम उमेदवार ठरतील. जगताप यांना उमेदवारी दिली तर ते प्रचंड मतांनी निवडून येतील. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा भाजपाला सोडवून घ्यावी. तसेच लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, अभिषेक बारणे, तुषार कामठे, तुषार हिंगे, सुरेश चिंचवडे, कैलास बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, निर्मला कुटे, आरती चोंधे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, माया बारणे, अर्चना बारणे, शर्मिला बाबर आदी नगरसेवक उपस्थित होते.