सेल्फीसाठी चाहत्यांनी केली गर्दी ; नवाजुद्दीनचा हात फ्रॅक्चर, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी त्याच्या भोवती गराडा घातला. त्यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. काही दिवसांपूर्वी नवाजु्द्दीन एका कार्यक्रमासाठी कानपूरला गेला होता. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी सेल्फीसाठी त्याच्या भोवती गर्दी केली. त्यावेळी सेल्फी घेताना एकाने त्याची मान पकडली. नंतर त्याचा हात इतक्या जोरात खेचला की त्याचा हात फ्रॅक्चर झाला.

नवाजुद्दीनचा हा सेल्फीच्या प्रसंगाची व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. कार्यक्रम उरकून नवाजुद्दीन हॉटेलकडे जात होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याला सेल्फीसाठी घेरले. एका चाहत्याने त्याचा गळा पकडला त्याचा हात खेचत आपल्याकडे ओढले. या खेचाखेचीत नवाजचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

 

परंतु याबाबत बोलताना नवाज म्हणतो की, “त्यात काय एवढं ? हे तर चाहत्यांचं प्रेम आहे. प्रेम व्यक्त करण्याची त्याची ती स्टाईल आहे.” असं नवाज म्हणतो. नवाजे त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. नवाजला स्क्रीनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. दरम्यान सेक्रेड गेम या गाजलेल्या वेब सीरिजच्या नवीन सीझनमधून लवकरच नवाज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.