Coronavirus : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं ! आणखी 25 जणांचा मृत्यू तर 393 नवे रूग्ण, ‘कोरोना’बाधितांचा आकडा 5982 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच आज मुंबईकरांचं टेन्शन आणखी वाढलं आहे. गेल्या 24 तासामध्ये मुंबईत कोरोनामुळं तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात तब्बल 393 नवे कोरोनाबाधिता आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 5982 वर जाऊन पोहचली आहे.

मुंबई आणि पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी झाला होता. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. मृत्यूंचे प्रमाण पुन्हा वाढत असताना आकडेवारीवरून दिसत आहे. आज दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील 393 रूग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासामध्ये 20 रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 23 ते 25 एप्रिल दरम्यानच्या 5 मृतांची नोंद आजच्या आकडेवारीमध्ये करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज दिवसभरात 219 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 1234 बाधित रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.