सरकारच्या ‘या’ पावलामुळं 10 रूपये प्रति लिटर स्वस्त होऊ शकतं पेट्रोल, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – डॉलरच्या तुलनेने रुपयात आलेल्या बळकटीने अंतर्गत बाजारामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 37 पैसे प्रती लिटर इतके स्वस्त झाले आहे. मंगळवारी किंमत स्थिर होती. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 74.63 रुपये होता तर डिझेलचा दर 5 पैशानी वाढून 66.99 रुपये प्रति लीटर वर पोहचला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार वारंवार मेथेनॉल ब्लेंडेड इंधन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. जर असे झाले तर एक लिटर पेट्रोलच्या किमतीत सरळ 10 रुपये प्रति लीटर चा फरक पडेल. एवढेच नाही तर सरकारच्या या निर्णयामुळे 30 % प्रदूषण देखील कमी होणार आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर  80.29 रुपयांवर स्थिर होता तर डिझेलच्या किमतीत वाढ होऊन दर 70.28 रुपये प्रति लीटर  वाढ झाली होती. याव्यतिरिक्त कोलकत्यात पेट्रोलचे दर 77.29 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 69.40 रुपये प्रति लीटर इतका होता.

सरकार उचलणार आहे मोठे पाऊल
मेथेनॉल ब्लेंडेड इंधन बाजारात आल्यावर कच्च्या तेलाची आयात देखील कमी प्रमाणात करावी लागेल. ज्यामुळे देशाला पाच हजार कोटी रुपये वर्षाला वाचवण्यासाठी मदत मिळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले आहे त्यात ते म्हणतात, मेथेनॉल ब्लेंडेड इंधन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.

सध्या केवळ 10 % एथेनॉल ब्लेंडेड इंधनाचा वापर केला जातो. परंतु याचा दर  42 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे, जो की खूप जास्त आहे.

मेथेनॉलचा दर 20 रुपये प्रति लीटर इतकाच आहे.  इंडियन ऑयल स्वतः हे इंधन बनवण्याचे काम करत आहे. याचा व्यवसायिक पातळीवरती वापर केला जातो.

नितीन गडकरी यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व पाठपुरावा केला आहे, आता पेट्रोलियम मंत्रालयाला पुढील काम करायचे आहे.

नीती आयोगाचे सदस्य वि.के. सारस्वत यांनी सांगितले की, M15 वर 65,000 किलोमीटरचे ट्रायल रण पूर्ण केले आहे. नीति आयोगने सांगितले की, इंधनात 15 % मेथेन ब्लेंड केल्यावर 2030 पर्यंत 100 अरब डॉलरची बचत होऊ शकते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/