आज मध्यरात्रीपासून केबल होणार बंद

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आवडीचे चॅनल्स निवडीसाठी ट्रायने दिलेली ३१ मार्चची मुदत दिली आहे . मात्र बहुतांश ग्राहकांनी अद्यापही चॅनल्सचे पॅकेज निवडले नसल्याचे समोर आले आहे. अजूनही चॅनल्स पॅकेजची निवड केलेली नसेल, अशा ग्राहकांचे केबल प्रक्षेपण रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून बंद होणार आहे.

टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) केबल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली लागू केली असून त्यामुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मात्र ग्राहकांनी अद्यापही चॅनल्सचे पॅकेज निवडले नसल्याचे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे ग्राहकांना या पॅकेजबाबत हवी तेवढी माहितीच नाही. ट्रायने ग्राहकांना आवडीच्या चॅनल्सचे पॅकेज निवडण्यासाठी ३१ मार्चची शेवटची मुदत दिले ली आहे. या मुदतीत पॅकेजची निवड न केलेले टीव्हींवरील केबल प्रक्षेपण बंद होणार आहे. मात्र तरीही ग्राहकांनी या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे.

ADV

काय आहेत ट्रायचे नवीन नियम –
केबलचालकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) केबल व डिश टीव्ही प्रक्षेपणात मोठे फेरबदल केले आहेत. केबलवर मासिक १३० रुपयांमध्ये १०० चॅनल्स ग्राहकांना दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना आवडीचे अधिक चॅनल्स हवे असल्यास त्यासाठी मासिक शुल्क भरून त्याची सेवा घेता येणार आहे.