×
Homeताज्या बातम्यामंगळवारचे पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या

मंगळवारचे पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मंगळवार म्हणजे 17 मार्च 2020 ला पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या दरात बदल झाला नाही. आज पेट्रोलाचा दर 69.59 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. तर, डिझेलचा दर सुद्धा 62.29 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. सरकारी इंधन कंपन्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी करतात.

आजचे महाराष्ट्रातील दर

मुंबई 75.30 – 65.21
पुणे 75.71 – 64.60
अहमदनगर 75.88 – 64.77
औरंगाबाद 75.60 – 64.49
धुळे 75.82 – 64.72
कोल्हापूर 75.54 – 64.47
नाशिक 75.20 – 64.12
रायगड 75.22 – 64.10

पेट्रोल किती टॅक्स
किरकोळ विक्री करणारे पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्ही जेवढी रक्कम भरता, त्यामध्ये तुम्ही 55.5 टक्के पेट्रोलसाठी आणि 47.3 टक्के डिझेलसाठी टॅक्स भरत असता. डिलर आणि पेट्रोल पंपवाले किरकोळ किमतीत ग्राहकांना पेट्रोल-डिझेल देताना ते शेवटी सर्व कर आणि स्वताचे मार्जिन जोडून नंतर विक्री करतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

1 एप्रिलपासून देशात विकेल जाईल BS-VI पेट्रोल-डिझेल
देशातील सार्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने शुक्रवारी म्हटले की, आता ते BS-VI इंधन पुरवठ्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. 1 एप्रिल 2020 पासून देशात BS-VI इंधनाचा वापर लागू होणार आहे. यासोबतच ग्राहकांना BS-VI इंधनासाठी थोडी जास्त किरकोळ किंमत चुकवावी लागेल.

Must Read
Related News