‘ऑलंपिक’वर राहणार उष्णतेचे सावट, टोकियोत ‘उष्णता’ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोक वाढत्या उष्णतेने हैराण आहेत. फ्रान्स पासून संपूर्ण युरोपात सध्या तापमान ४० डिग्री सेल्सियस पार झाले आहे. टोकियो देखील असेच हाल आहेत. तर टोकियोत पुढील वर्षी ऑलंपिकचे आयोजन करण्यात आले आहे.

२०२० साली ऑलंपिक गेम्स टोकियोत (२४ जुलैपासून ९ ऑगस्ट) आयोजित करण्यात आली आहे. परंतू यंदा जुलै महिन्यात ज्या प्रकारे उष्णतेची लाट पसरली आहे, त्यानुसार पुढील वर्षी देखील ही उष्णता ऑलंपिकला खेळायला येणाऱ्या खेळाडूंना अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. पुढील वर्षाचा पावसाचा अंदाज बांधणे सध्या कठीण असले तरी सध्याचे वातावरण पाहता पुढील वर्षी उष्णतेची लाट असणार असा अंदाज बांधला जात आहे.

journal-2_072719120409.png

मागील वर्षी २०१८ च्या जुलै महिन्यात उष्णतेने जपानमध्ये भीषण रुप दाखवले होते आणि परंतू या वर्षी मात्र उष्णतेची सर्वात भीषण अवस्था आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात ३०० पेक्षा आधिक लोकांची दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा तापमानाने रेकॉर्ड मोडत ४० डिग्री सेस्लियसपेक्षा जास्त वाढ होईल. वाढत्या उष्णतेने मागील वर्षी पूर्ण जपानमध्ये ५४ हजार पेक्षा आधिक लोक रुग्णालयात दाखल झाले आहे. ज्यात राजधानी टोकियो मधून ४४३० लोक सहभागी झाले होते.

journal-1_072719120305.png

खेळाडूंना होऊ शकतो वाढत्या उष्णतेने त्रास –
जपान मधील उष्णता वाढत चालली आहे. १९८० च्या दशकात तेथील तापमान २८ – २९ डिग्री सेल्सियस होते, आता ते वाढून ३० डिग्री सेल्सियस झाले आहे. यावर्षानंतर तर ते वाढण्याची शक्यता आहे.

एसी, फॉनची व्यवस्था –
यंदा उष्णतेमुळे स्टेडियममध्ये आयोजन स्थळावर एसी टेंट, पंखे देखील लावण्यात आले आहेत. ज्यामुळे वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवता येईल. याशिवाय स्टेडियम मध्ये मोफत बर्फ देण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

१९६४ नंतर पहिल्यांदाच टोकियोमध्ये ऑलंपिकचे आयोजन करण्यात आली आहे. ऑलंपिक गेम्स सुरु होण्याच्या आधीच टोकियोमध्ये उष्णतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आयोजकांचा प्रयत्न आहे की ऑलंपिकचे हे आयोजन अत्यंत भव्य आणि आकर्षक बनवण्यात यावे. उष्णतेचे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यात येणार आहे. परंतू सध्याची परिस्थिती पाहता खेळाडूंसह चाहत्यांना देखील उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –