दृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून टोमॅटोकडे पाहिलं जातं. आमटी असो किंवा मग कोशिंबीर टोमॅटोचा वापर त्यात केला जातो. टोमॅटोचे आपल्या शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

टोमॅटो खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) टोमॅटोमध्ये उष्मांक आणि कर्बोदकाचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळं रक्तदाब, हाय कोलेस्ट्रोल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. त्यामुळं आहारात नियमित याचा वापर केला पाहिजे.

2) वजन नियंत्रणात आणण्यासाठी टोमॅटोचं सेवन करावं. टोमॅटो खाल्ल्यानं पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळं भूक कमी लागते.

3) रातआंधळेपणा दृष्टीदोष या विकारांवर टोमॅटो खूप उपयुक्त आहे. अशा समस्या ज्यांना आहेत त्यांनी आहारात रोज एका टोमॅटोचं आवर्जून सेवन करायला हवं.

4) रक्ताची कमतरता (ॲनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज 2 टोमॅटो खावेत. यामुळं रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.

5) यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.

6) मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचं सेवन नियमित करावं.

7) टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण आणि साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ला तर हृदयविकार कमी होतो.

अशा व्यक्तींनी टोमॅटो खाऊ नये
– मुतखडा असणाऱ्यांनी टोमॅटोचं सेवन टाळावं.
– संधीवाताची समस्या असणाऱ्यांनी याचं सेवन करू नये.
– आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी टोमॅटो खाणं टाळावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.