Tomato Price Hike | टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढत चालल्याने केंद्र सरकार करणार ‘या’ उपाययोजना

पोलीसनामा ऑनलाइन – Tomato Price Hike | देशातील टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावणारा टोमॅटो हा आता जेवणाच्या ताटातून गायबच झाला आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकराने रास्त दरात टोमॅटो (Tomato Price Hike) विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अधिकची माहिती दिली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) यांच्यातर्फे नागरिकांचा खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी अगदी 70 रुपये किलो किंमतीमध्ये टोमॅटो दिला जाणार आहे.

नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) दिल्ली NCR यांच्यातर्फे देशातील विविध ठिकाणी टोमॅटो स्वस्त दरात विकण्यात येणार आहे. टोमॅटोचा बाजार भाव कमी करण्यासाठी आणि सामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीमध्ये टोमॅटो उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. आता भारत सरकार शेजारील देशाकडून देखील टोमॅटो खरेदी करत आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये भारत आता नेपाळ कडून टोमॅटो विकत घेणार (India buy tomatoes from Nepal) असल्याचे जाहीर केले आहे. नेपाळ कडून घेण्यात आलेला टोमॅटो हा देशातील लखनऊ (Lucknow), वाराणसी (Varanasi) आणि कानपूर (Kanpur) या भागांमध्ये विकण्यात येणार आहे.

याचबरोबर अर्थमंत्र्यांनी अधिकची माहिती देत सांगितले आहे की, केंद्र सरकारने बाहेरील देशांबरोबरच देशातील काही राज्यांकडून देखील टोमॅटो विकत घेतला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) व कर्नाटक (Karnataka) या राज्यांकडून टोमॅटो विकत
घेत NCCF च्या विविध केंद्राद्वारे रास्त दरात त्याची विक्री केली जात आहे. राजधानी दिल्ली (दिल्ली) सारख्या
शहरांमध्ये ऑनलाइन भाजीपाला विक्रीच्या माध्यामातून देखील टोमॅटोची विक्री केली जात आहे.
मागील काही दिवसांत टोमॅटोच्या किंमतीने (TOMATO PRICE HIKE ) गगनभरारी घेतली आहे.
यामुळे नागरिकांना तो परवडत नसल्याने भारत सरकारतर्फे काही पाऊले उचलली जात आहे.
त्यापर्यंत 1400 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. अनेक वर्षांनंतरची ही विक्रमी वाढ असून काही शहरात अगदी
400 रुपये किलोंनी देखील टोमॅटो विकले जात आहेत. यावर्षी टोमॅटोचे उत्पन्न कमी झाल्याने ही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | वॉर रुमवरुन मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विजय वडेट्टीवार यांचा दावा

Independence Day | पुण्यातील ध्वजारोहणावरुन संभ्रमाची अवस्था निर्माण केली जात आहे, पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करतील; भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे स्पष्टीकरण (Video)