Vijay Wadettiwar | वॉर रुमवरुन मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विजय वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीवर घणाघाती टीका करताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीचं निमित्त साधलं आहे. अजित पवारांनी वॉररुममध्ये (Warroom) बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमवरुन कोल्ड वॉर सुरु झाल्याचा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमवरुन कोल्ड वॉर सुरु झाला आहे. कारण अधिकार नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार वॉररुमध्ये बैठक घेतली.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मीडियाशी संवाद साधाना हा दावा केला. खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूम मध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा फायनान्स विभागाचा (Finance Department) काही संबंध नसतो. म्हणजे वॉररुममध्ये कोल्डवार सुरु झाला आहे. तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने गेलाय हे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) पाहिलं असेल, असा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात मलिदा खायचं असले तर मिळून खातात पण जनतेच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. राज्यात जे सुरु आहे ते सगळं हास्यास्पद आहे. पालकमंत्र्याचा (Guardian Minister) पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) व पालकमंत्री नियुक्ती रखडल्या आहेत. 28 मंत्री कार्यरत आहेत. 28 मंत्री 28 जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते आणि जनतेला न्याय देऊ शकले असते. मात्र तिथे पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकारी यांना ध्वजारोहण (Flag Hoisting) करावं लागतंय, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर (State Government) घणाघाती टीका केली.

केंद्र सरकारने (Central Government) केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या (Central Election Commissioner)
निवडीसाठीच्या समितीत बदल केले आहेत. यावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या देशातील निवडणुका निष्पक्ष,
पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सरन्यायाधीशांची (Chief Justice) नियुक्ती केली होती.
मात्र, केंद्र सरकारने यामध्ये बदल करत सरन्यायाधीशांना वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला आहे.
आता पंतप्रधानांनी मंत्र्यांचे नाव सुचवाव म्हणजे जी मंडळी त्या ठिकाणी बसणार आहेत, ज्यांची निवड करण्यात
त्याची निवड निष्पक्षपणे होणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Income Tax | नोकरदार वर्ग वाचवू शकतो टॅक्स; ‘या’ आहेत काही गुंतवणुकी ज्यामुळे टॅक्स सेव्ह करणे होईल सोपे

PM Kisan | पीएम किसानच्या हफ्त्यासाठी असे करा नवीन रजिस्ट्रेशन! फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या स्टेप्स

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल महिला गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 39 वी स्थानबध्दतेची कारवाई