धावती लोकल पकडणे बेतले जीवावर

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

धावती लोकल पकडणे हे जीवघेणे आहे, अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, प्रवासी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहेत. धावती लोकल पकडण्याच्या मोह न आवरल्याने अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशाच पद्धतीने अति घाई करत लोकल पकडणे एका तरुणाच्या जीवावर बेतले असुन लोकल पकडताना तरूणाचा प्राण गेला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16b3ca79-cbc4-11e8-97b2-ff068aa8725d’]

सुदर्शन चौधरी (वय ३१) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा आहे. सदर घटना दादर रेल्वे स्थानकावर घडली आहे.

मुळचा नागपूर येथील असलेला ३१ वर्षीय सुदर्शन मालाड येथे वास्तव्यास होता. सुदर्शन आई-वडिलांना एकुलता एक होता. सुदर्शनचे लग्न दोन महिन्यांवर येवून ठेपले होते. यामुळे घरी लग्नाची तयारी सुरु होती, अशा वातावरणात रविवारी ट्रेकिंगला जातो म्हणून निघालेला सुदर्शन ट्रेकिंगला आला नाही आणि घरी ही परतला नाही. मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल दादर रेल्वे पोलिसांकडे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सुदर्शनच्या मित्रांसह दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. तपासाअंती सीसीटीव्ही फुटेजनूसार, दादर येथून फलाट क्रमांक १ वरुन धावती लोकल पकडताना तोल गेल्यामुळे दादर फलाट जवळ (ठाणे दिशेकडील) सुदर्शनचक्र अपघात झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1bad7079-cbc4-11e8-b2ee-3ba09b6d2ff5′]

दादर रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना प्रवाशांनी धावती लोकल पकडू नये, असे आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे म्हणाले की , “शनिवार-रविवार सुट्टी असल्याने मुंबईतील विविध ट्रेकर ग्रुप आणि तरुणाई ट्रेकिंगसाठी कसारा, कर्जत येथे जातात. आठवड्याभरातील थकवा दूर करण्यासाठी ‘ट्रेकिंग’ला तरुणाईंचा चांगला प्रतिसाद मिळतो. कोणतेही धाडस करताना आपल्या कुटूंबियांचा विचार करावा. यामुळे तरुणांसह सर्व प्रवाशांनी योग्य भान राखून प्रवास करावा, धावती लोकल पकडू नये. ”

तनुश्री दत्ता प्रकरण : नाना पाटेकर यांच्यासह चाैघांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस