HDFC आणि ICICI Bank आणतेय फेस्टिव्ह ऑफर्स, ग्राहकांना मिळणार डिस्काऊंट, कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI चा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्सवाचा हंगाम जवळ येत असल्यामुळे बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी मोठ्या ऑफर्स जाहीर करण्यास सुरवात केली आहे. एसबीआयनंतर आता एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेनेही फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर केल्या आहेत. बुधवारी एचडीएफसी बँकेने फेस्टिव्ह ट्रीट्स ‘Festive Treats’ 2.0 लाँच केली आहे, तर आयसीआयसीआय बँकेने खास फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर्सची घोषणा केली आहे. या बँका या फेस्टिव्ह ऑफरमध्ये आपल्या ग्राहकांना काय ऑफर देतात ते जाणून घेऊया.

एचडीएफसी बँकेचे फेस्टिव ट्रीटस २.० मध्ये ग्राहकांसाठी १००० हून अधिक ऑफर्स आहेत. यापूर्वी फेस्टिव्ह ट्रीट्सची पहिली आवृत्ती खूप यशस्वी ठरली होती. फेस्टिव्ह ट्रीट्स २.० मध्ये ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड, बिझिनेस लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन आणि होम लोन इत्यादींच्या अनेक ऑफर्स आहेत. तसेच येथे अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक व्यापाऱ्यांसह टायअपच्या माध्यमातून २,००० हून अधिक हायपरलोकल ऑफर देखील बँकेकडून सादर केल्या जात आहेत.

एचडीएफसी बँकेने किरकोळ ग्राहक तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठीही ऑफर जाहीर केल्या आहेत. यात कर्जावरील प्रक्रिया शुल्कात सूट, कमी ईएमआय, कॅशबॅक, गिफ्ट व्हाउचर्ससह अनेक फायद्यांचा समावेश आहे.

एचडीएफसी बँकेने स्टोअर व ऑनलाईन शॉपिंगवर सवलत, कॅशबॅक आणि एक्सट्रा रिवॉर्ड पॉईंट्ससाठी रिटेल ब्रॅण्ड्सबरोबर टायअप देखील केले आहे. अमेझॉन, टाटा क्लिक, मिंत्रा, पेपरफ्राय, स्विगी आणि ग्रोफर्स या दरम्यान स्पेशल डील्स ऑफर करतील. प्रमुख रिटेल आणि ग्राहक वस्तू जसे कि- लाइफस्टाईल, बाटा, माँटे कार्लो, विजय सेल्स, कोहिनूर, जीआरटी इत्यादी देखील विविध वस्तू व सेवांवर ५ ते १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देतील.

एचडीएफसी बँक फेस्टिव्ह ट्रीट्स २.० मधेय हेही समाविष्ट

ऍपल (APPLE) कंपनीच्या उत्पादनांवर (नव्याने लॉन्च केलेल्या उत्पादनांसह) एचडीएफसी बँकेचे ग्राहक ७,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. एखादा दुकानदार २२.५% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतो आणि आपली खरेदी सॅमसंग, एलजी, सोनी, गोदरेज आणि पॅनासॉनिक या प्रमुख ब्रँडवर नो एक्स्ट्रा कॉस्ट ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतो.

बँक ऑटो लोन, पर्सनल लोन आणि बिझिनेस ग्रोथ लोन्सवरील प्रोसेसिंग शुल्कात ५० टक्के सवलत देत आहे. तसेच दुचाकी कर्जांवर शून्य प्रक्रिया शुल्क दिले जात आहे.

आयसीआयसीआय बँक देत आहे या ऑफर्स

बँकेने बुधवारी फेस्टिव्ह बोनान्झा जाहीर केला आहे. येथे ग्राहकांना बेसिक ब्रॅण्ड्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपासून ते लक्झरी आयटम्सपर्यंत प्रत्येक वस्तूवर हजारो रुपयांची सूट आणि कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. फेस्टिव्ह बोनान्झामध्ये काही ऑफर गुरुवारपासून सुरू होत आहेत आणि काही येत्या उत्सवाच्या हंगामात सुरू होतील. फेस्टिव्ह बोनान्झामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्स, कपडे आणि दागिने, आरोग्य आणि कल्याण, किराणा व खाद्य पदार्थ, वाहन व फर्निचर आणि करमणूक व ई-लर्निंग इत्यादी श्रेणींमध्ये ग्राहक आकर्षक ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

फेस्टिव्ह बोनान्झामध्ये टॉप ब्रॅण्ड्सवर ग्राहक आकर्षक सूट मिळवू शकतात.
या ब्रॅण्ड्समध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, बिगबास्केट, झोमॅटो, स्विगी, पेपरफ्राय, टीबीझेड इत्यादींचा समावेश आहे. ग्राहक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे या ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.

आयसीआयसीआय बँकेच्या फेस्टिव्ह बोनान्झामध्ये हेही आहे खास

गृह कर्जावर आणि इतर बँकांकडून गृह कर्जावर हस्तांतरणावर आकर्षक व्याज दर ६.९० टक्क्यापासून सुरू होते आणि प्रक्रिया शुल्क ३,००० पासून सुरू होते. ऑटो लोनवर ८४ महिन्यांच्या कालावधीसाठी ईएमआय १५५४ रुपयांपासून सुरू होतो.

दुचाकी वाहनांवरील कर्जावर ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी ईएमआय १,००० रुपयांपासून सुरू होतो.
तत्काळ पर्सनल लोनवरील आकर्षक व्याजदर १०.५० टक्क्यांपासून सुरू होईल. ग्राहक फायनान्स लोन: प्रमुख ब्रॅंड्सचे होम अप्लायन्सेस आणि डिजिटल उत्पादनांवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा. तसेच कमीतकमी कागदपत्रांसह वेगवान आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे.