30 जूनपर्यंत आवश्य करा ‘हे’ महत्वपुर्ण काम, अन्यथा नंतर होईल तुमचं मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपते आणि या तारखेपर्यंत वेगवेगळी आर्थिक कामे पूर्ण करावी लागतात. यामध्ये कर-बचत गुंतवणूक करणे आणि आपल्या प्राप्तिकर परतावा (आयटीआर) उशीरा दाखल करणे समाविष्ट आहे. परंतु यावेळी कोरोना विषाणूच्या साथीच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे अनेक कामांची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या कामांबद्दल सांगणार आहोत, जी 30 जूनपर्यंत पूर्ण केली नाहीत तर नुकसान होऊ शकते.

छोट्या बचत योजनांमध्ये किमान रक्कम गुंतवावी
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) किंवा सुकन्या समृद्धि योजना (SSY) सारख्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत किमान रक्कम गुंतवावी लागते, जेणेकरून खाते सक्रिय राहील. लॉकडाऊनमुळे लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूकीची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. पीपीएफमध्ये गुंतवणूकदाराला वर्षाकाठी किमान 500 रुपये गुंतवावे लागतात. त्याचबरोबर एसएसवाय मध्ये किमान 250 रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते.

पॅन कार्डला आधारशी लिंक करा
आपला स्थायी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याची शेवटची तारीख देखील 30 जून आहे. आपण अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर 30 जून 2020 पर्यंत खात्री करुन घ्या. आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल. जर आपले पॅन निष्क्रिय झाले तर आपण आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.

कर बचत गुंतवणूक करा
आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर बचत गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. प्राप्तिकर विभागाने नव्याने अधिसूचित टॅक्स फॉर्ममध्ये एक सारणी जोडली आहे, ज्यात एखादी व्यक्ती जून आणि एप्रिल महिन्यात झालेल्या कर बचत गुंतवणूकीची माहिती देऊ शकते आणि सन 2019-20 या आर्थिक वर्षात करात सूट मागू शकते.

आर्थिक वर्ष 2019 साठी दाखल करा आयटीआर
सामान्यत: आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असते. तथापि, एखादी व्यक्ती मूल्यांकन वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा 31 मार्च पर्यंत उशीराने आयटीआर दाखल करू शकते. आर्थिक वर्ष 2019 साठी आयटीआर उशिरा दाखल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 होती, जी 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता ज्यांना विलंबित आयटीआर किंवा आर्थिक वर्ष 2019 साठी सुधारित परतावा भरायचा आहे, ते 30 जून 2020 पर्यंत यास दाखल करू शकतात. मागील आयटीआर दाखल करताना एखाद्याने चूक केली असेल तर ते देखील 30 जूनपर्यंत सुधारित रिटर्न दाखल करू शकतात.