Coronavirus : चिंताजनक ! राज्यात ‘कोरोना’चे 113 नवे रूग्ण, महाराष्ट्राचा आकडा 748 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे. आज (रविवारी) दिवसभरात तब्बल 113 नवीन रूग्ण आढळून आले असून आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 748 वर जाऊन पोहचली आहे. ही अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब आहे. कोरोनामुळं आज मुंबई 8, पुण्यात 3 आणि औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगरसह इतर काही ठिकाणी कारोनाचे रूग्ण आढळले आहेत. प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न चालु आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात 113 नवीन रूग्ण आढळले असून आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 748 वर जाऊन पोहचली आहे.