बसची वाट पाहणाऱ्या महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कंपनीत कामावर जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेस भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सहाच्या सुमारास घडली.

मीरा विद्यानंद इगल (वय-२७ रा. पास्टा, पो. शिवली, जि. जालना हल्ली रा. बाजाजनगर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात बजाजनगर येथील मोहटादेवी मंदिरासमोर झाला.

बजाजनगर येथे राहणाऱ्या मीरा इलग या परिसरातील एका कंपनीत कामावर आहेत. आज सकाळीं सहाच्या दरम्यान त्या नेहमीप्रमाणे कंपनीत कामासाठी जाण्यास घरून निघाल्या. मोहटादेवी मंदिरासमोर कंपनीच्या बसच्या थांब्यावर त्या उभा होत्या. याच दरम्यान एका भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने (MH- 20, CY- 117) त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.