परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील ढालेगाव गोदावरी पात्रातून अवैध प्रकारे रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाला 11 जानेवारी रोजी आढळून आल्याने ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे
पाथरी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करून बेकायदेशीररित्या रेतीची चढ्या दराने विक्री होत आहे. या प्रकरणी महसूल प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी गस्त देत आहे. पाठीमागील काही महिन्यांपासुन गोदापात्र रेतीची अवैधरित्या विनापरवाना उत्खनन करुन वाहतूक होत आहे.
या प्रकरणाला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी गस्तीची उपायोजना अवलंबली जात आहे. अशातच शुक्रवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास गोदा पात्रातून बेकायदेशीर विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने महसूल प्रशासनाकडून ट्रॅक्टर जप्त करून पाथरी पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आला.
बाभळगाव मंडळाचे मंडळाधिकारी प्रकाश गोवंदे आणि लोणी सजाचे तलाठी सचिन शिंदे हे गस्तीवर असताना त्यांना विनापरवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारा टॅक्टर आढळून आल्याने त्यांच्याकडून जप्तीची कारवाई करण्यात आली
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या