भररस्त्यात तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन

वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी आडवून नियमाचे उल्लंघन केल्याचा जाब विचारला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने भररस्त्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नं -४, ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी (दि.१८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
[amazon_link asins=’B07DFYSGS3,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75d41b6c-bbf0-11e8-bc33-834e6e90f34f’]

वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर अप्पा मुंडे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

उल्हासनगर कॅम्प नं -4, ओ टी सेक्शन परिसराततून भरधाव जाणाऱ्या मोटारसायकला थांबविण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर यांच्यासह सोबत असलेल्या वॉर्डनने केला. तेव्हां भरधाव मोटारसायकलचा कट त्यांच्या हाताला लागल्याने, त्यांच्या हातातील बिलबुक व डोक्यावरील टोपी खाली पडली. बिलबुक व टोपी घेण्यासाठी खाली वाकलेल्या पोलीस वाहतूक पोलिसाला मोटरसायकलस्वार अप्पा मुंडे यांनी मोटारसायकल अडविल्याच्या रागाच्या भरात रावसाहेब काटकर यांना मारहाण करू लागला. या प्रकाराने खळबळ उडाली असून अप्पा मुंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c4790f5-bbf0-11e8-92b1-07add4964802′]

वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण करण्याचे चित्रण मोबाइलफोनमध्ये चित्रित होत असल्याचे अप्पा मुंडे यांच्या लक्षात आल्यावर, त्याने मारहाण करणे बंद करुन पोलिसांच्या शर्टाची कॉलर पकडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अप्पा मुंडे याला अटक करून पोलिसाला मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे आदी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.