आता 11 ‘डिजीट’चा असेल तुमचा मोबाईल नंबर, जाणून घ्या पूर्ण ‘डिटेल्स’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या आपला मोबाईल नंबर 10 आकडी आहे, परंतु आता तो 11 आकडी होऊ शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (टीआरएआय) ने शुक्रवारी देशात 11 अंकी मोबाईल नंबर वापरण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. ट्रायच्या नुसार 10 अंकी मोबाईल नंबर 11 अंकी मोबाईल नंबरमध्ये बदलल्यानंतर देशात जास्त नंबर उपलब्ध करता येतील.

ट्रायने आपल्या प्रस्तावात हेदेखील सांगितले आहे की, देशात मोबाईल नंबरचा पहिला अंक 9 ठेवला तर तो 10 वरून 11 अंकांच्या मोबाईल नंबरवर स्विच झाल्याने देशात एकुण 1000 करोड नंबर्सची क्षमता होईल. ट्रायनुसार 70 टक्के यूटिलायजेशन आणि सध्याच्या पॉलिसीसोबत 700 करोड कनेक्शन होणे पुरेसे आहे.

या शिवाय ट्रायने फिक्स्ड लाईनवरून कॉल करताना मोबाईल नंबरच्या पुढे शून्य लावण्याबाबतही म्हटले आहे. सध्या फिक्स्ड लाईन कनेक्शनवरून इंटर-सर्व्हिस एरिया मोबाईल कॉल्स करण्यासाठी पुढे शून्य लावावा लागतो. तर मोबाईलवरून लँडलाईनवर सुरूवातीला शून्य न लावतासुद्धा कॉल करता येतो.

याशिवाय ट्रायने एक नवा नॅशनल नंबरिंग प्लॅनचा सुद्धा प्रस्ताव दिला आहे, जो लवकरच उपलब्ध करायचा आहे. तसेच ट्रायने डोन्गल्सच्या वापरासाठी वापर होणार्‍या मोाबाईल नंबरला 10 अंकावरून वाढवून 13 अंकी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. म्हणजे आता लवकरच तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर 11 अंकी होणार आहे. लवकरच याबाबतची पुढील माहिती पोलीसनाद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.