पुण्यातील ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहर पोलीस दलातील ५ पोलीस निरीक्षकांच्या काल (मंगळवारी) रात्री उशिरा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह २ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बदल्या बाबतचे आदेश पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी काढलेले आहेत.

१६ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या

मंगळवारी आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये केलेल्या शिफारशी नुसार या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे. संजय विठ्ठल नरवाड (कंट्रोल रूम ते विशेष शाखा-२), शब्बीर सत्तार सय्यद (कंट्रोल रूम ते वाहतूक शाखा), राजेश रामचंद्र तटकरे (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक-गुन्हे-अलंकार पोलीस स्टेशन), दिनकर नामदेव मोहिते (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन) आणि मुरलीधर गंगाधर करपे (पोलीस निरीक्षक-गुन्हे-खडकी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा-युनिट ३)

जाहिरात