राहुल गांधींनी केली तृतीयपंथी व्यक्तीची काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड

चेन्नई : तामिळनाडू वृत्तसंस्था – तृतीयपंथी पत्रकार आणि कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी निवड झाली असून राहुल गांधी यांनी रेड्डी यांची नेमणूक केली आहे. तृतीय पंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राहुल गांधी यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतास पात्र आहे असे बुद्धीजीवी समाजाकडून म्हणले जात आहे.

अण्णा द्रमुकम या पक्षात कार्यरत असणाऱ्या अप्सरा रेड्डी यांनी आत्ता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या आधी त्यांनी भाजप मध्ये ही काम केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये पत्रकारितेत शिक्षण घेतलेल्या अप्सरा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मासिकात काम केले आहे. त्यांनी आजपर्यंत महिलांच्या प्रश्नांवर काम केले आहे. २०१६ साली त्यांनी भाजपमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. भाजप पक्षात काम करताना त्यांना विचार स्वातंत्र्याला बंधन येत असल्याचे सांगत भाजपला सोडत  अण्णा द्रमुक मध्ये गेल्या. दिवंगत नेत्या जयललिता यांनी अप्सरा यांची प्रवक्ता म्हणून नेमणूक केली जयललिता यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी द्रमुक सोडले होते. सध्या त्या कोठेच कार्यरत नसताना त्यांनी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

२०१७ साली हि पश्चिम बंगाल येथील असाच एक संविधानातील समतेचा अविष्कार दाखवणारा प्रकार घडला होता. पश्चिम बंगाल येथील इस्लामपूर न्यायालयात न्यायाधीश म्हणून ‘जोयता मुंडन’ यांची नेमणूक करण्यात आली. या हि एक तृतीय पंथी होत्या आणि त्यांना त्यांच्या तृतीय पंथी असल्यामुळे दहावी इयत्तेतून शाळा सोडायला समाजाने भाग पाडले होते. तरी ही त्या खचल्या नाहीत त्यांनी समाजाच्या यातनांना सहन करत आपले एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या न्यायाधीश पदावर गेल्या. असाच आजचा प्रसंग आहे.