आता तुमच्या ‘त्या’ कारवर लागणार हिरव्या रंगाची नंबर प्लेट, पिवळ्या रंगानं लिहावा लागणार नंबर, सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : गाडीच्या नंबर प्लेटच्या रंगाबाबत सरकारकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. सरकारने स्पष्टीकरणात म्हटले आहे की, बॅटरीवर चालणार्‍या वाहनांवर हिरव्या रंगाची नंबर प्लेट आणि त्यावर पिवळ्या रंगाने गाडीचा नंबर लिहिण्याचे काम पहिल्याप्रमाणेच जारी राहील.

यासोबतच रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने एक नोटिफिकेशन सुद्धा जारी केले आहे. या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, वाहनांच्या अस्थायी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असेल.

त्यावर लाल रंगात अक्षरे-अंक लिहिलेले असतील. तर डिलर्सकडे ठेवलेल्या वाहनांची नंबर प्लेट लाल रंगाची असेल, ज्यावर सफेद रंगात अक्षरे-अंक लिहिलेले असतील.

मंत्रालयाने म्हटले आहे की, हे नोटिफिकेशन केवळ वाहनांच्या नंबर प्लेटची बॅकग्राऊंड आणि त्यावरील अंकित अक्षरे-अंकांच्या रंगाशी संबधित अस्पष्टता दूर करण्यासाठी जारी करण्यात आले आहे.

मंत्रालयाने म्हटले की, या नोटिफिकेशनमध्ये काहीही नवीन जोडण्यात आलेले नाही. वाहनांमध्ये 7 रंगांची नंबर प्लेट असते. ही प्लेट- सफेद, निळी, पिवळी, लाल, हिरवी, काळी आणि बाणाच्या निशाणीची असते.

प्रत्येक रंगाच्या प्लेटचा आपला एक अर्थ आहे. उदाहरणार्थ सफेद प्लेट समान्य गाड्यांसाठी, पिवळी प्लेट कमर्शियल गाड्यांसाठी आणि निळी प्लेट परदेशी प्रतिनिधींसाठी वापरली जाते.

अशाप्रकारे, काळ्या रंगाची प्लेट असलेली गाडी सुद्धा कमर्शियल असते, परंतु ही एखाद्या खास व्यक्तीसाठी अधिकृत असते. तर, इलेक्ट्रिक परिवहन वाहनांसाठी नंबर प्लेटचा बँकग्राऊंड कलर हिरवा निर्धारित आहे.

जर एखाद्या गाडीवर लाल रंगाची नंबर प्लेट आहे तर ती गाडी भारताचे राष्ट्रपती किंवा अन्य राज्याच्या राज्यपालांची असू शकते. सैन्य वाहनांसाठी वेगळ्याप्रकारची नंबरींग प्रणाली वापरली जाते. अशा गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये पहिल्या किंवा तिसर्‍या अंकाच्या ठिकाणी वर इशारा करणार्‍या बाणाची निशाणी असते, ज्यास ब्रॉड अ‍ॅरो म्हणतात.