बोलेरोतून गावठी दारूची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बोलेरोतून कान्हूरपठार (ता. पारनेर) परिसरात गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजारांची दारू, बोलेरो असा सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्यांमध्ये संभाजी पोपट चौघुले (वय- ४५ वर्षे, रा. आण्णापूर, ता. शिरुर, जि- पुणे, ह. रा. गाडीलगाव, ता- पारनेर), अशोक कान्हू धोत्रे (वय- ५५ वर्षे, रा. वडारवाडी, कान्हूरपठार, ता- पारेनर) यांचा समावेश आहे.

दि. ०२/०३/२०१९ रोजी पासून जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द धडक कारवाई चालू असून सदरची कारवाई चालू असताना दि. ०८/०३/२०१९ रोजी पहाटे पोनि / दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय बातमीदारांकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, इसम नामे संभाजी चौघुले (रा. आण्णापूर, ता- शिरुर) हा बोलेरो जिप मधून गावठी हातभट्टीचे दारुची वाहतूक करुन सदरची गावठी दारु ही पारनेर तालूक्यातील कान्हूरपठार व आजूबाजूच्या खेडेगांवामध्ये विक्री करतो, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई / ज्ञानेश फडतरे, सफौ / सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ / दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण,

रविन्द्र कर्डीले, आण्णा पवार, सुरेश माळी, संदीप घोडके, चालक बाळासाहेब भोपळे अशांनी मिळून पहाटे कान्हूरपठार येथे जावून गावामध्ये सापळा लावला. त्यानंतर सकाळी ६:३० वा. चे सुमारास एक सफेद रंगाची बोलेरो जिप वेसदरे गावाकडून येणाऱ्या रस्त्याने कान्हूरपठार बाजारतळ येथील गोडावून जवळ आली. त्यावेळी पथकातील कर्मचा-याची सदर बोलेरो जिप ला घेराव घालून सदरची बोलेरो जिप व ती मधील दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टाफची ओळख देवून त्यांना त्यांचे नांव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव व, पत्ता १) संभाजी पोपट चौघुले, वय- ४५ वर्षे, रा. आण्णापूर, ता. शिरुर, जि- पूणे, ह. रा. गाडीलगांव, ता- पारनेर, २) अशोक कान्हू धोत्रे, वय- ५५ वर्षे, रा. वडारवाडी, कान्हूरपठार, ता- पारेनर असे असल्याचे सांगीतले.त्यांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

१) ५०,०००/-रु.किं.ची ५०० लिटर गावठी हातभट्टीची दारु, ३५ लिटर क्षमतेचे १४ व १० लिटर क्षमतेचा १ ड्रम २) ४,००,०००/-रु. किं. ची सफेद रंगाची बोलेरो जिप क्रं. एमएच-१२-जीआर-८१७३, जू.वा.किं.अं. ४,५०,०००/-रु. एकूणवरील प्रमाणे गावठी हातभट्टीची दारु व जिप जप्त करुन आरोपी विरुध्द पारनेर पो.स्टे. फिर्यादी पोना/सुनिल चव्हाण यांचे फिर्यादी वरुन गुरनं. मा २२४/२०१९, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(अ), (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही पारनेर पो.स्टे. हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. ईशू सिंधु साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सागर पाटील साहेब,अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री. मणिष कलवानिया साहेब, सहायक पोलीस अधीक्षक, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.