पिंपरी : ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीला धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि१५) दुपारी तीनच्या सुमारास वल्लभनगर येथील सुखवानी सिटी सोमोरील रस्त्यावर झाला.

पराग जगतराव अहिरराव (वय-२५ रा. वल्लभनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चेतन वाघ (वय-२६ रा. सांगवी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मेहुणा पराग आहिरराव हा त्याच्या दुचाकीवरुन भरधाव वेगात घराकडे जात होता. वल्लभनगर येथील सुखवाना सिटी समोरील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीला परागच्या दुचाकीची पाठीमागून धडक बसली. या अपघातात पराग हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.