15 ऑगस्टला जम्मू काश्मीरमधील सर्व पंचायतींमध्ये तिरंगा फडकण्यासाठी ‘ही’ योजना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी 15 ऑगस्टच्या निमित्ताने जम्मू काश्मीरच्या सर्व पंचायचींमध्ये तिरंगा फडकवण्याच्या योजनेवर काम करत आहे. एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने तशी माहिती दिली आहे. असे सांगितले जात आहे की, यासाठी राज्यात 10 हजार अतिरीक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. एका सत्राने सांगितले आहे की, “अनेक पंचायतींची अशी इच्छा आहे की, स्वतंत्र दिनाच्या दिवशी तिथे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात यावा. अतिरीक्त दल यासाठी तैनात करण्यात आले आहे की, यात कोणतीही अडचण निर्माण न होवो किंवा एखादी नको असलेली घटना समोर न येवो.”

भाजपाने सर्व पंचायतींना निर्देश दिले आहेत की, त्यांनी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवावा. त्यांचं असंही म्हणणं आहे की, असे केल्याने जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यास मदत मिळेल. ही निवडणूक याच वर्षी होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त सैन्य तैनात केल्याचे अंदाज आहेत. अनेकजण म्हणत होते की, सरकार या राज्याला घेऊन मोठा निर्णय घेणार आहे. भाजपाने मंगळवारी प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावलं होतं. याआधी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर दौरा केला होता. हे सर्व घटनाक्रम पाहता अशा अंदाजाना आणखीच जोर आला आहे. असेही समजत आहे की, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –