PM नरेंद्र मोदी यांना अमेरिकन अध्यक्षांचा सर्वोच्च पुरस्कार, ट्रम्प यांनी केलं सन्मानित

वाशिंग्टन : भारत -अमेरिका यांच्यातील संबंध वाढविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिझन ऑफ मेरिट हा पुरस्कार दिला आहे. लिझन ऑफ मेरिट हा अमेरिकन अध्यक्षांनी दिलेला प्रतिष्ठित पुरस्कार आहे. विशेषत: राज्य प्रमुख किंवा इतर देशांच्या प्रमुखांना हा पुरस्कार दिला जातो. भारताचे राजदूत तरणजितसिंग साधु यांनी पंतप्रधानांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्थिर नेतृत्वाची आणि जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयास येणाऱ्या दृष्टीकोनाची आणि भारत -अमेरिका यांच्या सामरिक भागीदारीच्या प्रगतीसाठी तसेच जागतिक शांतता व समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. या समारंभात डिझीन ऑफ मेरिट, डिग्री चीफ कमांडर हे पुरस्कार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना देखील प्रदान करण्यात आले.

या पुरस्काराची सुरुवात अमेरिकन काँग्रेसने २० जुलै १९४२ रोजी केली होती. अमेरिकेसाठी सर्वोच्च कामगिरी करणारे लष्करी अधिकारी तसेच परदेशी अधिकार्‍यांना देण्यास सुरुवात केली होती.