कार्यकर्ते आणि इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची ; पोलिसांकडून हवेत गोळीबार

मतदारांची किंमत फक्त ३०० रुपये

थेनी : वृत्तसंस्था – तमिळनाडुमधील थेनी लोकसभा मतदारसंघातील आयकर अधिकाऱ्यांनी एका दुकानावर छापा मारला. तेथे मतदारांना देण्यासाठी प्रत्येक पाकिटात ३०० रुपये ठेवले होते व त्या पाकिटांवर वार्ड नंबर आणि मतदारांची संख्या लिहिली होती. या दुकानावर कारवाई करत असताना अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले. त्यांनी आयकर अधिकाऱ्यांना पैसे जप्त करण्यास मनाई केली. त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी चार वेळा हवेत गोळीबार केला.

money

टीटीवी दिनाकरन यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुकचे हे कार्यकर्ते होते. या ठिकाणी उद्या मतदान होत आहे.
आयकर अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी थेनी जिल्ह्यातील अन्दिप्पती येथील एका दुकानावर छापा घातला. दुकानातील तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांची रोकड अधिकाऱ्यांनी जप्त केली. ही रक्कम मतदारांना वाटण्यात येणार होती. दुकानदार शटर खाली ओढून पळून गेला. त्यानंतर अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले. पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या पाकिटात वॉर्ड नंबर आणि मतदारांची संख्या लिहिली होती. याशिवाय प्रत्येक पाकिटात ३०० रुपये ठेवण्यात आले होते. यावेळी १ कोटी ४८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.