Tuberculosis Disease And Symptoms | दरवर्षी 2 लाखांहून अधिक लोकांचा ‘या’ आजाराने होतो मृत्यू, अशी लक्षणं दिसताच अलर्ट व्हा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tuberculosis Disease And Symptoms | कर्करोग आणि हृदयरोगासह क्षयरोगामुळे (Cancer, Heart Disease And Tuberculosis) (टीबी) जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडतात. भारतासाठीही हा आजार गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी टीबीमुळे अडीच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Of Health) जाहीर केलेल्या अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये देशातील टीबी रुग्णांच्या (TB Patients) संख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात २०२० मध्ये १६,२८,१६१ जणांना टीबीची लागण झाली होती, तर २०२१ मध्ये एकूण रुग्णांची (नवीन आणि पुन्हा उद्भवलेली) संख्या वाढून १९,३३,३८१ झाली आहे (Tuberculosis Disease And Symptoms).

 

क्षयरोग हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगास कारणीभूत जीवाणू खोकला आणि शिंकण्याद्वारे एका व्यक्तीकडून दुसर् या व्यक्तीकडे पसरतात. आरोग्य तज्ञांच्या मते, हा गंभीर आजार टाळण्यासाठी सर्व लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. सर्व लोकांना त्याच्या लक्षणांबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या लक्षणांच्या आधारे या गंभीर संसर्गजन्य आजाराचा धोका ओळखता येईल (Tuberculosis Disease And Symptoms) ?

 

जर आपल्यालाही ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत खोकल्याची समस्या (Coughing Problem) असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हा आजार आपल्या फुफ्फुसांवर विपरित परिणाम करतो, ज्यामुळे खोकला सतत येऊ शकतो. इतर काही लक्षणांमध्ये छातीत दुखणे, दम लागणे आणि खोकल्यासह रक्तस्त्राव देखील होतो.

रात्री खुप घाम येणे (Sweating A Lot At Night) –
रात्री खुप घाम येणे, हे क्षयरोगाचे एक सामान्य लक्षण असू शकते. फुफ्फुसातील समस्यांमुळे लोकांना अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, फुफ्फुसात बॅक्टेरिया वाढल्यामुळे ताप येऊन किंवा न येताही रात्री जास्त घाम येतो.

 

थकवा जास्त येतो (High Fatigue) –
क्षयरोगाच्या रुग्णांना थकवा जास्त येतो. या आजारामुळे शरीर कमजोर होतं ज्यामुळे रुग्णांमध्ये थकव्याची समस्या कायम राहू शकते. सततच्या खोकल्यामुळे तुम्हालाही थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांशी लवकर संपर्क साधा.

 

अचानक वजन कमी झाल्याने भूक मंदावण्याची समस्या ही या आजाराच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. फुफ्फुसांच्या प्रभावाने भूक कमी लागते. भूक न लागल्याने आणि जेवता येत नसल्याने वजनही कमी होऊ लागते, त्यामुळे क्षयरोगाच्या रुग्णाचे आरोग्य सतत कमकुवत होत असते.

 

टीबी पासून सुरक्षित कसे राहावे (How To Stay Safe From TB) ? –
जर आपल्याला टीबीचे निदान झाले असेल तर, औषधोपचारांसह उपचार करण्यासाठी सामान्यत:
काही महिने लागू शकतात. या काळात औषधांमध्ये अंतर ठेवू नका.

काही गोष्टी लक्षात ठेवा (Remember This Things) :

बंद जागेत टीबीचे जंतू अधिक सहज पसरतात. हवा खेळती राहील अशा खोलीत राहावे.

शिंकताना किंवा खोकल्यावर तोंड चांगलं झाकून ठेवा.

घाण टिश्यूपेपर डस्टबिनमध्येच टाका.

फेस मास्क घाला. उपचारादरम्यान आणि टीबीपासून बचाव करण्यासाठी, दोन्ही परिस्थितींमध्ये फेस मास्क परिधान केल्याने संक्रमणाचा धोका कमी होतो.

फुफ्फुसांना निरोगी ठेवणारे व्यायाम करा.

 

दम लागण्याच्या किंवा खोकल्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Tuberculosis Disease And Symptoms | tuberculosis disease and its symptoms in marathi how to prevent tb disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Heart Disease | ‘या’ साध्या सवयींमुळेही हृदयरोगाचा धोका वाढतो; जाणून घ्या

 

Yoga For Arthritis Patients | सांध्यातील वेदना-दाह कमी करण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रभावी; जाणून घ्या

 

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ