देशात टीबीचे प्रमाण सर्वांत जास्त   

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचे बॅक्टेरिया जेव्हा शरीराच्या एखाद्या भागात म्हणजे छाती, पोट किंवा हाडांमध्ये प्रवेश करतात आणि तेथे दीर्घकाळपर्यंत टिकून राहणारी सूज निर्माण करतात, त्यास त्या भागाची टीबी झाली आहे असं म्हटलं जातं. या ट्युबरकुलोसिसशिवाय बोवीसुद्धा टीबीकरिता जास्त कारणीभूत ठरतो. हे विषाणू टीबीच्या रुग्णाच्या नाक किंवा गळ्यातून निघणाऱ्या स्रावाद्वारे किंवा मायक्रोबॅक्टेरियाद्वारा संक्रमित अन्नपाण्याद्वारे किंवा आनुवंशिकता आणि संक्रमित गर्भवतीपासून तिच्या भ्रूणामध्ये येत असते.

देशात टीबी सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येते. त्यास पॅल्मॅनरी टीबी म्हटलं जातं. त्याचे दोन प्रकार असतात. प्रायमरी टीबी हा पूर्णपणे निरोगी छातीमध्ये दिसून येतो. हा आजार त्या रुग्णामध्ये दिसून येतो, ज्यास अगोदर कधीही कोणत्याही भागात टीबी नव्हता. हा मुख्यत: लहान मुलांमध्ये दिसून येतो. वेळेवर त्याच्यावर उपचार केले नाही तर छातीमध्ये सूज वाढते आणि तिथे पाण्यासारखा द्रव स्रवित होतो. हे संक्रमण छातीमधून लिव्हर, किडनी आणि ब्रेनकडेसुद्धा जात असतं. त्यास मिलीअर टीबी म्हटलं जातं. प्रायमरी टीबीला नियंत्रित केलं जात नाही, तेव्हा सेकंडरी टीबी होत असते. यामध्ये मुख्यत: छातीच्यावर लोब संक्रमित होतो. तरुणांमध्ये या टीबीचं संक्रमण वाढण्याचं एक कारण एड्ससुद्धा आहे. एड्समुळे शारीरिक रोगप्रतिकार क्षमता कमी होत असते. त्यामुळं हा रोग बळावतो.

ह्याही बातम्या वाचा –

गडकरींना राग अनावर … म्हणाले ‘गप्प बसा… नाहीतर थप्पड खाल’ 

हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर ; “या” मतदार संघातून लढवणार निवडणूक

पुणे : काॅलेजच्या कॅन्टीनमध्ये ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ

‘सामना’ ने घेतला यू-टर्न ; सरकाराचे ‘रेकॉर्डब्रेक’ कौतुक 

‘या’ दिवशी ठरणार रणबीर – आलियाच्या लग्नाची तारीख !