Tuljapur Crime | खोटे सोने तारण ठेऊन बँकेला लाखोंचा गंडा, 4 जणांना अटक

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  तुळजापूर (Tuljapur Crime) येथील एका बँकेत खोटे सोने (Fake Gold) बँकेत तारण ठेऊन 18 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तुळजापूर (Tuljapur Crime) पोलीसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन चार जणांना अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार 100 रुपये जप्त केले आहेत. हा प्रकार ऑगस्ट 2021 मध्ये घडला.

रशीद अल्लाउद्दीन नदाफ (रा. आरबळी, ता. तुळजापूर), सद्दाम नसीर शेख (रा.मोहोळ, जि. सोलापूर), कोंडाजी हारुण खुदादे, अब्बास राजु पठाण (दोघे रा. इटकळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
या चौघांना 7 ते 11 सप्टेंबर या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.
याप्रकरणी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) तुळजापूर शाखेचे व्यवस्थापक सुनिल क्षिरसागर (Manager Sunil Kshirsagar) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात (Tuljapur police station) 26 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जणांनी 8 वेळेला एकूण 564.8 ग्रॅम वजनाचे खोटे सोन्याचे दागिने आयसीआयसीआय बँकेत तारण ठेवले.
सोने तारण ठेऊन आरोपींनी 17 लाख 70 हजार 851 रुपयाचे कर्ज (Gold Loan) घेतले.
काही दिवासंनी आरोपींनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने खोटे अलसल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

 

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते.
पोलिसांनी आरोपींना वेगेवेगळ्या ठिकाणाहून शोध घेऊन अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कार्जाच्या रकमेपैकी 1 लाख 35 हजार 100 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असून आरोपींनी 3 लाख 21 हजार 516 रुपये कर्ज खात्यात यापूर्वीच भरले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन (SP Raj Tilak Roshan) यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद (Police Inspector Ajinath Kashid), सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे (API Dnyaneshwar Kamble), पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस नाईक यादव, सावरे, साळुंके, ससाणे, पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Tuljapur Crime | Millions robbed of bank by pledging fake gold, 4 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सोसायटीच्या वर्गणीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा, 5 जणांवर FIR

MLA Gopichand Padalkar | श्री. मार्तंड देवस्थानचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘आमदार पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले’

Bigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री