Pune Crime | सोसायटीच्या वर्गणीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा, 5 जणांवर FIR

पुणे / नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) नारायणगाव (Narayangaon) येथील एका सोसायटीमध्ये देखभाल वर्गणी (Maintenance) वरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी (fight) झाली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon police station) परस्पर विरोधी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबातील 5 जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना नारायणगाव येथील सनसिटी को.ऑप.हौसिंग सोसायटीत (Suncity Co-op Housing Society) घडली.

याप्रकरणी सनसिटी को ऑफ. हौसिंग सोसायटीत राहणारे राजेंद्र बबन भोर, ऋषिकेश राजेंद्र भोर, लता राजेंद्र भोर व नीलेश रोहिदास सरोदे, चैत्राली निलेश सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राजेंद्र भोर (Rajendra Bhor) याला अटक केली आहे. निलेश सरोदे हे सनसिटी को ऑप हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास देशपांडे (API Vilas Deshpande) यांनी सांगितले.

राजेंद्र भोर हे सोसायटीची देखभाल वर्गणी (मेटेनन्स) देत नाही. यासंदर्भात चर्चा सरोदे हे अन्य व्यक्ती सोबत करत होते.
यावरुन भोर व सरोदे कुटुंबात झालेल्या बाचाबाचीतून तुफान हाणामारी झाली.
एकमेकांना पाईप व काठीने मारहाण केली.
यासंदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | narayangaon fight over maintenance subscription of society five people have been charged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Gopichand Padalkar | श्री. मार्तंड देवस्थानचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘आमदार पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 155 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sleeping Tips | झोपेसंबंधी ‘या’ 5 चुकांमुळे येतंय अकाली वृद्धत्व, तरूण दिसण्यासाठी करा ‘ही’ सुधारणा; जाणून घ्या