Tunisha Sharma Death | अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिझान खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tunisha Sharma Death | छोट्या पडद्यावरील Tv अभिनेत्री तुनिषा शर्माने काल मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमधील प्रसाधनगृहात तिने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Tunisha Sharma Death)
याप्रकरणी अभिनेत्रीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर तीचा कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. यानंतर आता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान खानला अटक करण्यात आली होती. शिझान खानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. याच प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने आत्महत्या केल्याचे तिच्या आईने सांगितले आहे.
#UPDATE | TV actor Tunisha Sharma death case: Tunisha Sharma's co-star Sheezan Khan produced in Vasai court in Mumbai.
— ANI (@ANI) December 25, 2022
आज दुपारी शिझान खानला वसई न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयाने झिशानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यामुळे आता चार दिवस तो पोलीस कोठडीत असणार आहे. मात्र पोलिसांकडे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत.
त्याच्यावर फक्त आरोप केले जात आहे अशी माहिती शिझान खानच्या वकिलांनी दिली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Web Title :- Tunisha Sharma Death | tv actor tunisha sharma death case accused sheezan khan sent to 4 day police custody by vasai court
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी
Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार