लोकांच्या सतत तक्रारीनंतर हिंदुस्थानी भाऊचे फेसबुक अकाऊंटही सस्पेंड, जाणून घ्या कारण
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेला बिग बॉस 13 चा स्पर्धक विकास पाठक आजकाल अडचणीत सापडला आहे. लोकांच्या सतत तक्रारी आल्यानंतर विकास पाठकचे इंस्टाग्राम अकाउंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते आणि आता त्याचे फेसबुक अकाऊंटही भडकाऊ कन्टेन्टमुळे निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर कविता कौशिक, कुणाल कामरा, कुब्रा सैत, फराह खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली.
सेलिब्रिटींच्या मते विकास पाठकचा हा व्हिडिओ बर्यापैकी भडकाऊ होता. ज्यामुळे त्याचा इतर वापरकर्त्यांवर चुकीचा परिणाम होत आहे. या तक्रारींनंतर विकास पाठकचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित झाले आणि त्यानंतर त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरही असेच काहीसे घडले आहे. हिंदुस्थानी भाऊचे अधिकृत फेसबुक पेज निलंबित करण्यात आले आहे. सेलिब्रिटींसोबतच इतर काही वापरकर्त्यांनीही हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओंविषयी माहिती दिली होती. त्यानंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
स्क्रीनशॉट शेअर करताना फेसबुकने वापरकर्त्यांना हिंदुस्थानी भाऊचे फेसबुक पेज डिलीट केल्याची माहिती दिली आहे. फेसबुकच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानी भाऊंचे व्हिडिओ समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत आहेत. ज्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी बिग-बॉस 13 चा स्पर्धक असलेल्या हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओंवर फेसबुकवरील अनेक सेलिब्रिटींनी आक्षेप घेतला होता. अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामला टॅग करत अनेक ट्वीट केले होते. यानंतर इंस्टाग्रामच्या मालकीची कंपनी फेसबुकने हे पाऊल उचलले.