निधनापूर्वी अभिनेत्री लीना आचार्य आणि अभिषेक भालेराव यांचा झाला होता संवाद ! व्हायरल झालं WhatsApp Chat

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अभिषेक भालेराव (Abhishek Bhalerao) यानं टीव्ही अ‍ॅक्ट्रेस लीना आचार्य (Leena Acharya) हिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लीनासोबत झालेल्या एका चॅटचा स्क्रीनशॉट त्यानं सोशलवर शेअर केला आहे. सध्या हा स्क्रीनशॉट सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. अचानक अशा प्रकारे लीनाच्या जाण्यानं अभिषेक खूप दुःखी आहे.

लीना अभिषेकला काय म्हणाली होती ?

व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये लीना अभिषेकला म्हणाली आहे की, ती सध्या काहीच करत नाही. या वर्षी ती फक्त आराम करेल. ती असंही म्हणाली होती की, पुढील वर्षी ती मुंबईत येणार आहे.

लीनानं शनिवारी (दि. 21 नोव्हेंबर) दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. किडनी फेल झाल्यानं तिनं जीव गमावला. गेल्या दीड वर्षापासून ती किडनीच्या आजारानं त्रस्त होती.

काही दिवसांपूर्वीच लीनाच्या आईनं तिला किडनी डोनेट केली होती. परंतु तरीही तिचा जीव वाचू शकला नाही. दिल्लीतील रुग्णालयातच तिनं जगाचा निरोप घेतला.

लीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सेठ जी, आप के आ जाने से, मेरी हानिकारक बिवी अशा अनेक मालिकेत काम केलं आहे. तिनं सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. यात राणी मुखर्जीचा हिचकी हा सिनेमाही समाविष्ट आहे.

You might also like