Bigg Boss 14 : पुढील आठवड्यात होणार शोचा फिनाले ! ‘भाईजान’ सलमाननं केली घोषणा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. असं असलं तर ही सीजन गेल्या सीजन प्रमाणे धमाल करताना दिसत नाही. सीन पलटेगा अशी या शोची टॅग लाईन आहे. या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) घरातल्या सदस्यांना फिनाले बद्दल सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर घरातील लोक चकित होताना दिसणार आहेत. आता गेममध्ये धमाल येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एका वृत्तानुसार, या वीकेंड वॉरमध्ये सलमान खान मोठी घोषणा करणार आहे. सलमान सर्वांना चकित करत सांगत आहे की, बिग बॉस 14 ची फायनल पुढील वर्षी नाही तर पुढील हप्त्यात होणार आहे. फायनल मध्ये फक्त 4 स्पर्धक असतील.

आता ही गोष्ट ना घरातल्यांना पचत आहे आणि ना ही प्रेक्षकांना. त्यांनाही कळेना सलमान खरं सांगत आहे खोटं. सोशलवर अनेक युजर्स सलमान खान अशा प्रकारे प्रँक करत असल्याचं सांगत आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर आता सोशलवर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी हे खरं असेल तर नाराजीचा सूरही काढला आहे.

You might also like